SSC PRACTICE TEST
1, GOPAL NAGAR, SOUTH AMBAZARI ROAD, NAGPUR-440022
MO. 9604446344
दहावीच्या विद्यार्थ्यासाठी कंप्यूटरवर सराव परीक्षा
एम.के.सी.एल. तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बीजगणित, भूमिती,
शास्त्र आणि इतिहास या विषयांकरीता कंप्यूटरवर सराव परीक्षा उपलब्ध
करून देण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नसंच आणि उत्तरे इंग्रजी, मराठी तसेच
सेमी इंग्रजी पध्दतीमध्ये उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील दहावीसाठी बसणा-या
१६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होऊ शकेल. एम.के.सी.एल.च्या
सुमारे ५००० हून अधिक एम.एस.सी.आय.टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्रांमधून ही
परीक्षा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे.
या सराव परीक्षेकरीता ४०००० हून अधिक कंप्यूटर्स या केंद्रामध्ये
उपलब्ध असतील. एम.के.सी.एल.च्या ईरा या सॉफ्टवेअर प्रणालीतून ही परीक्षा
विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली असून दहावीच्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक बोर्डाच्या आभ्यासक्रमावर आधारीत ऑबजेक्टीव्ह प्रश्नोत्तरे या सराव
परीक्षांकरीता तयार केली आहेत. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना
त्यांच्या वेळेनुसार शाळेत शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी यानिमित्ताने करता
येईल. या परीक्षेस येणा-या विद्यार्थ्याला अभ्यासाचे प्लॅनिंग कसे
करावे? परीक्षेदरम्यान आहार काय असावा ? याचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे याचा उपयोग
विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे शाळांनी करावा असे आवाहन एम.के.सी.एल. तर्फे
करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 09604446344 येथे संपर्क
साधावा.
No comments:
Post a Comment